Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत(श्रेडिंग)प्रकल्पाचे मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन.

11 Sep 2021

निर्माल्याचे श्रेडिंग करून त्यापासून खत निर्माण करणार्‍या रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मा.आ मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. हे उपक्रमाचे ५ वे वर्ष असून दर वर्षी १५० टन खत निर्मिती होते व ते खत शेतकरी व नागरिक यांना मागणी प्रमाणे मोफत दिले जाते. आज पर्यन्त सुमारे ५०० टन निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक जयंत भावे,रोटरी युवाच्या अध्यक्ष रो. तृप्ती नानल,सेक्रेटरी रो.दिपा बडवे,प्रोजेक्ट डायरेक्टर रो.मनोज धारप,रोटरी डिस्ट्रिक्ट एनव्हायरमेंट डायरेक्टरर रो.  समीर रुपाणी,पुणे महानगरपालिकाचे वारजे वॉर्ड ऑफिस वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश किरीड,प्रशांत दामले,राहुल शेळके,रोटरी क्लब युवाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मेघाताई कुलकर्णी यांनी समाजोपयोगी प्रकल्पात सातत्य राखल्या बद्दल समाधान व्यक्त केले,तसेच मोठ्या सोसायट्यांना रोटरी क्लबने असे श्रेडिंग प्रकल्प उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

छायाचित्र :उद्घाटन करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite