Peoples Media Pune header

Go Back

परवेझ तांबोळी यांनी पुण्यातील गरजू रुग्णांना पुरविला मोफत ऑक्सीजन

23 Apr 2021

सध्याच्या भीषण अशा कोविड महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या ऑक्सीजनची खूप गरज निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी पवळे चौक कसबा येथील एक कार्यकर्ता परवेझ तांबोळी हे अत्यवस्थ रुग्णांना अॅडमिट होईपर्यंत मोफत ऑक्सीजन पुरवठा करीत आहे. यासाठी त्यांनी १० छोटे व २ मोठे ऑक्सीजन सिलेंडर व कॉन्संट्रेटर्स विकत घेतले असून त्यात ऑक्सीजन सिलेंडर(बॉटल)आहेत. रुग्णाची व्यवस्था होईपर्यंत ते रुग्णांना मोफत ऑक्सीजन पुरवतात. त्यांनी झोपडपट्टीतील नागरिक व काहीवेळा तर रुग्णालयांना ही काहीवेळा ऑक्सीजन पुरवठा केला आहे. तसेच अर्ध्यारात्री सुद्धा बेड मिळवून देणे. प्लाझ्मा इत्यादींसाठी मदत करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे ५५ पेक्षा  रुग्णांची मोफत  ऑक्सीजन सेवा केली आहे.व सध्या ही सेवा सुरू आहे. 

छायाचित्र :परवेझ तांबोळी ऑक्सीजन सिलेंडर व कॉन्संट्रेटर्स सोबत 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite