Peoples Media Pune header

Go Back

स्व.शरदभाई शहा यांच्या स्मरणार्थ “बादशहा”रक्तदान शिबिराचे आयोजन.

14 Apr 2021

जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन पुणे परिवारच्या वतीने स्व.शरदभाई शहा यांच्या स्मरणार्थ “बादशहा”या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महावीर प्रतिष्ठान सँलसबरी पार्क,लेक टाऊन स्थानक,व गंगाधाम सोसायटी अशा तीन ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. या प्रसंगी आयोजक युवराज शहा(पुणे झोनल को ओर्डिंनेटर),,तिमिर संघवी,सुजस शहा,स्मिताबेन शरद शहा,बिरेन शहा,राजीव शहा,रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड,नगरसेवक प्रविण चोरबेले ,हरेशभाई शहा,अभय छाजेड (पुणे शहर कॉग्रेस अध्यक्ष) आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे जैन साध्वी हिमानीजी महाराज साहेब यांनीही रक्तदान केले. या प्रसंगी बोलताना युवराज शहा यांनी उपक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले. राम बांगड यांनी आजच्या कोरोना महामारीच्या काळातील रक्ताचा तुटवडा चिंताजनक असून अशा रक्तदान शिबिरातून नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाचे सहाय्य होत आहे असे संगितले. या शिबिरात १२५ पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले. घोलप ब्लड बँक व सहाय्यता ग्रुप यांनी तांत्रिक संचालन केले.  

छायाचित्र : जैन साध्वी हिमानीजी महाराज साहेब रक्तदान करताना.व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite