Peoples Media Pune header

Go Back

देवदासी भगिनींच्या मुलांना स्वरदाताई बापट यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप.

23 Mar 2021

नटरंग अकादमीच्या उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदाताई गौरव बापट यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ नानावाडा येथे शिक्षण घेणार्‍या देवदासी भगिनींच्या मुलांना भेटवस्तू वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्या वाढदिवसाच्या आनंदात समाजातील उपेक्षित घटकांना सामावून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जतिन पांडे (नटरंग अकादमी),अश्विनी पांडे,संध्या फुले,सुधीर दाते,अलकाताई,प्रणव कडेकर आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. बालकांशी संवाद साधताना स्वरदा बापट यांनी मुलांनो खूप खेळा,व खूप अभ्यास ही करा,व मोठ्ठे व्हा असे संगितले.

छायाचित्र :बालकांसोबत केक कापताना स्वरदाताई बापट. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite